वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सन्माननीय सभासद यांसी,

स.न.वि.वि.
आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २३/०८/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. संस्थेच्या “समाजमंदिर” मधील कै. गो. ग. देव सभागृहात घेण्यात येईल. सभेत खालील कामकाज होईल. तरी आपण सभेस वेळेवर व आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.

सभेपुढील कामे

  1. मागील दि. १३/०७/२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत वाचून मंजूर करणे.
  2. दि. ३१/०३/२०२६ अखेर संपलेल्या वर्षातील कार्याचा कार्यकारी मंडळाचा अहवाल, सनदी हिशोब तपासनिसांनी तपासलेले आय-व्यय पत्रक व ताळेबंद यांस मंजुरी देणे.
  3. सन २०२६-२७ सालाकरिता अंतर्गत व सनदी हिशोबतपासनिसांची नेमणूक करणे व सनदी हिशोबतपासनिसांचा मेहेनताना ठरविणे.
  4. सनदी हिशोबतपासनीसांच्या दि. ३१/०३/२०२६ रोजी संपलेल्या वर्षाच्या तपासणी अहवालाची नोंद घेणे.
  5. सन २०२७-२८ वर्षासाठी उपायुक्त सार्व. न्यास, ठाणे यांना सादर करावयाच्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
  6. संचालक / व्यवस्थापक मंडळाकडून आलेले ठराव मंजूर करणे.सभासदांकडून आगाऊ आलेल्या लेखी ठरावांचा व सूचनांचा विचार करणे.
  7. सभासदांकडून आगाऊ आलेल्या लेखी ठरावांचा व सूचनांचा विचार करणे.
  8. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सभेपुढे येणारे विषय.

आपले नग्न,

KBSMD Logo

श्री. विनायक दि. जांभेकर
सरकार्यवाह

KBSMD Logo

डॉ. श्री. अरुण अ. नाटेकर
अध्यक्ष

टिप :

  1. गणसंख्येअभावी स्थगित झालेली सभा त्याच दिवशी व त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व त्याला गणसंख्येचे बंधन राहाणार नाही.
  2. संस्थेचा वर्ष (२०२५-२०२६) चा अहवाल व सनदी हिशोबतपासनीसांनी तपासलेले संस्थेचे ताळेबंद व आय व्यय पत्रक संस्थेच्या कार्यालयात दि. १७/०८/२०२६ पर्यन्त सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत मिळेल. दि. १४/०२/२०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे आता सभासदांना वार्षिक अहवाल पाठविण्यात येणार नाहीत. ज्या सभासदांना वार्षिक अहवाल हवा असेल त्यांनी तो संस्थेच्या कार्यालयातून घ्यावा. तसेच बाहेरगावी असलेल्या सभासदांना अहवाल हवा असल्यास तसे त्यांनी लेखी कळवावे, त्यांना अहवाल पोस्टाने पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल.
  3. ज्या सभासदाना काही सूचना करावयाच्या असतील त्यांनी अशा सूचना कार्यालयात दि. १७/०८/२०२६ पर्यंत लेखी आणून द्याव्यात.
  4. ज्या सभासदांना ठराव मांडावयाचा असेल त्यांनी ठराव, सूचक व अनुमोदक यांच्या सह्यांनिशी दि. १७/०८/२०२६ पर्यंत सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत कार्यालयात आणून द्यावा.

विद्दोष सूचना :

  • सभेची सांगता स्नेहभोजनाने होईल.