वार्षिक अहवाल – सन २०२५-२०२६

सन्माननीय सभासद बंधु – भगिनींनो,
नमस्कार,
सर्वप्रथम समस्त ज्ञाती बांधवांना, संस्थेच्या सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना अभिवादन. आज आपल्याला भेटताना मनामध्ये एक आनंद आहे की गेले वर्षभर सुरु असलेले संस्थेचे समाज कार्य आपणां सर्वांपर्यन्त पोहोचविण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. या वर्षभरात आलेल्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या संस्थेच्या कार्याचा अहवाल आता आपल्या समोर मांडत आहे.

  रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कै. गो. ग. देव सभागृहात संपन्न झाली.  अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या १२ सभा व व्यवस्थापक मंडळाच्या सभा  झाल्या. तसेच नगर कार्यकारिण्यांच्या  व विविध समित्यांच्या सभा त्यांच्या कार्यक्रमानुसार झाल्या. अहवाल वर्षात २१ लग्ने, १३ साखरपुडे, बारसे समारंभ, १४ वाढदिवस  ४ डोहाळ जेवण, व्रतबंध व इतर १० धार्मिक कार्य आपल्या सभागृहात झाले. दरवर्षीप्रमाणे सर्व सभासदांना वार्षिक अहवाल घरपोच न पाठवता तो अहवाल छापून संस्थेच्या कार्यालयात इच्छुक सभासदांसाठी उपलब्ध करून दिला व सर्वसाधारण सभेत उपस्थित असणाऱ्या सभासदांना वार्षिक अहवालाचे वाटप केले .सर्व कार्यकारिण्या आणि समित्यांच्या या वर्षातील कार्याचा मागोवा आपण आता पुढीलप्रमाणे घेत आहोत.

PDF डाउनलोड करा आणि वाचा -वार्षिक अहवाल